कारवाईसाठी पोलीस पथक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:23+5:302021-05-29T04:30:23+5:30

................ मान्सूनपूर्व कामांना वाशिममध्ये वेग वाशिम : नाल्यांची साफसफाई, झाडांच्या अनावश्यक फांद्या तोडणे यासह अन्य स्वरूपातील मान्सूनपूर्व कामांना वाशिम ...

Police squad on the road for action | कारवाईसाठी पोलीस पथक रस्त्यावर

कारवाईसाठी पोलीस पथक रस्त्यावर

................

मान्सूनपूर्व कामांना वाशिममध्ये वेग

वाशिम : नाल्यांची साफसफाई, झाडांच्या अनावश्यक फांद्या तोडणे यासह अन्य स्वरूपातील मान्सूनपूर्व कामांना वाशिम शहरात चांगलाच वेग आला आहे. या कामी नगरपरिषद व महावितरणने पुढाकार घेतला आहे.

.................

अवैध रेती वाहतूक सुरूच

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व दुकाने बंद राहून सकाळी ११ वाजतानंतर केवळ मेडिकल्स व दवाखाने सुरू राहत आहेत. मात्र, अशाही स्थितीत शहर परिसरातून अवैध वाहतूक सुरूच असून, वाहने राजरोस धावताना दिसून येत आहेत.

...............

पुसद नाक्यावर वाहतूक ठप्प

वाशिम : सकाळी ७ ते ११ या वेळेत आवश्यक सेवेची दुकाने सुरू राहत असल्याने, शहरात दैनंदिन गर्दी होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांसोबतच इतर जिल्ह्यातून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे स्थानिक पुसद नाक्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले.

.................

दुचाकीच्या चोरीचे प्रमाण घटले

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात उद्योगधंदे बंद राहत असल्याने, बहुतांश नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन दुचाकीच्या चोरीचे प्रमाण घटल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

Web Title: Police squad on the road for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.