‘त्या’ आरोपींच्या शोधात पोलीस रवाना
By Admin | Updated: May 11, 2015 01:59 IST2015-05-11T01:59:50+5:302015-05-11T01:59:50+5:30
फेसबुकच्या माध्यमातून प्रेयसीवर अत्याचार प्रकरण.

‘त्या’ आरोपींच्या शोधात पोलीस रवाना
मालेगाव : फेसबुकच्या माध्यमातून प्रेयसीवर अत्याचार करणार्या युवकाला अटक केल्यानंतर उर्वरित दोन आरोपींना शोधण्यासाठी मालेगावचे पोलीस पथक १0 मे रोजी रवाना झाले.
मूळ वाशिम जिल्ह्यातील; परंतु सध्या ठाणे जिल्ह्यात एका इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या एका २६ वर्षीय युवतीची मालेगाव येथील विशाल अडीचवाल याच्याशी २0१४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीचेरूपांतर प्रेमात झाले. यातूनच विशालने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले, अशी तक्रार मालेगाव पोलिसांत पीडित युवतीने दिली. युवकाच्या आई-वडिलांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
मालेगाव पोलिसांनी विशाल अडीचवाल, अनिल अडीचवाल, शीला अडीचवाल यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यापैकी विशालला अटक केली असून, उर्वरित आरोपींना शोधण्यासाठी पोलिस रवाना झाले आहे.