पंचाळा येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: May 25, 2017 01:43 IST2017-05-25T01:43:43+5:302017-05-25T01:43:43+5:30

वाशिम : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंचाळा (ता.जि.वाशिम) शेतशिवारातील धरणाजवळ असलेल्या दारू अड्डयावर ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला.

Police raids at village liquor at Panchal | पंचाळा येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

पंचाळा येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंचाळा (ता.जि.वाशिम) शेतशिवारातील धरणाजवळ असलेल्या दारू अड्डयावर ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये गावठी दारू व साहित्य असा एकुण ९३ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यामधील अवैध दारू, अवैध व्यवसाय हद्दपार करण्याच्या दृष्टीने पोलिस दलाने कंबर कसली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात पोलीसांनी अवैध धंद्याविरूध्द मोहिम उघडली आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पंचाळा शेतशिवारात छापा टाकला.
या छाप्यामध्ये मोहगव्हाण येथील रन्नू छट्टू भवानीवाले याच्या ताब्यातून सडवा मोहमाच , दारू साहित्य, गावठी दारू साठा असा एकुण ९३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई रमेश राठोड, नागेश खंडके व संजय आमटे यांच्या पथकाने केली.

Web Title: Police raids at village liquor at Panchal