पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST2021-09-21T04:47:32+5:302021-09-21T04:47:32+5:30

रिसोड तालुक्यातील हराळ येथे अवैध गावठी दारू गाळप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला ...

Police raid a village liquor den | पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा

पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा

रिसोड तालुक्यातील हराळ येथे अवैध गावठी दारू गाळप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता जयसिंग चाटसे (वय ४८, रा. हराळ) हा इसम परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारूचे गाळप करून त्याची विक्री करीत असताना आढळला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंदाजे ५,४०० रुपये किमतीचा ९० लिटर सडवा मोहामाच व २,४०० रुपये किमतीची ३० लिटर गावठी असा एकूण ७,८०० रुपयांचा माल जप्त करून नष्ट केला, तसेच त्याच्यावर दारूबंदी कायद्याखाली कारवाई करून अटक करण्यात आली. ही कारवाई रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव गायकवाड, पो.हे.कॉ. प्रदीप चव्हाण, पो.कॉ. गणेश जाधव, पो.कॉ. गोपाल पांडे यांनी केली.

Web Title: Police raid a village liquor den