कुपटा येथे पोलिसांची जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:42 IST2021-03-05T04:42:09+5:302021-03-05T04:42:09+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुपटा-दारव्हा मार्गावर जगदंबा धाब्याजवळ सागर गतुले यांच्या शेतात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ...

Police raid a gambling den at Kupta | कुपटा येथे पोलिसांची जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

कुपटा येथे पोलिसांची जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुपटा-दारव्हा मार्गावर जगदंबा धाब्याजवळ सागर गतुले यांच्या शेतात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तिघांना रंगेहाथ पकडले, तर काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३४० रुपये तसेच डावामध्ये एक्का बादशाह चार्ट, ५२ तास पत्ते व रोख २६० रुपये असा एकूण १२३० रुपयांचा ऐवज जप्त केला. यात आरोपी रूपेश मधुकर भार साकळे, निरंजन जगदेव राठोड, विनोद सुखदेव जाधव यांच्याविरुद्ध मुंबई जुगार ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली, तर ग्राम कुपटा येथे वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या लिहून पैसे घेऊन वरली मटका खेळत असल्यावरून आरोपी मिलिंद लक्ष्मण कांबळे या आरोपीवर मुंबई जुगार ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली.

Web Title: Police raid a gambling den at Kupta