शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात पोलिसाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; काजळेश्वर गावावर शोककळा

By संतोष वानखडे | Updated: January 1, 2024 17:55 IST

सुनील अजाबराव गणेशपूरे यांचे निधन, आणखी एक पाेलिस जखमी

संतोष वानखडे, वाशिम: कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील रहिवासी, माजी सैनिक तथा मानोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनील अजाबराव गणेशपूरे (४८) यांचा कर्तव्यावर असताना दुचाकी अपघातात ३१ डिसेंबरला रात्रीदरम्यान मृत्यू झाला. १ जानेवारी रोजी शासकीय इतमामात त्यांच्यावर काजळेश्वर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.मानोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी सुनील गणेशपूरे व प्रविण गव्हांदे हे दोघे माेटारसायकलने मानोरा येथून कारंजाकडे जात असताना ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दापुरासमोरील एका पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये सुनील गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गव्हांदे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशपूर यांच्या मृत्यूची वार्ता कळताच परिवारासह गावावर शोककळा पसरली. याच वर्षी ग्रामपंचायत व गामस्थांकडून त्यांचा भारतीय सैन्य दलाचे माजी सैनीक म्हणून भावपूर्ण सत्कार झाला होता. मोक्षधाम काजळेश्वर येथे १ जानेवारी रोजी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, कारंजा ग्रामीणचे ठाणेदार सुनील वानखडे, मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे व पोलीस कर्मचारी, माजी सैनिक संघटनेच्यावतीने त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाने बंदूकीच्या फैरी झाडल्या. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई,दोन भाऊ असा आप्त परीवार आहे.

टॅग्स :washimवाशिमDeathमृत्यूPoliceपोलिस