पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By Admin | Updated: June 1, 2015 02:16 IST2015-06-01T02:16:47+5:302015-06-01T02:16:47+5:30
वाशिमवर अन्याय; चार अधिकारी बदलले, मिळाले दोन अधिकारी.
_ns.jpg)
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
वाशिम : पोलीस महासंचालनालयाने शनिवारी रात्री पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर केली असून, त्यात वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय परदेशी यांच्यासह चौघांचा समावेश आहे. यादीनुसार वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय परदेशी यांची बृहन्मुंबई येथे, विलास बेनीसिंह चव्हाण यांची चंद्रपूर येथे, राजेश भगवान मुळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, तर रवींद्र रामचंद्र पडवळ यांची गुन्हे अन्वेषण विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्यांमध्ये मुंबई येथून गजानन महादेवराव गुल्हाने व विशेष सुरक्षा विभागातील कुंदनकुमार बापूराव वाघमारे या दोघांचा समावेश आहे. एका ठिकाणी दोन वर्षे हा निकष लावून राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी या यादीतही बराच घोळ असल्याचे पुढे आले आहे.