ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलनात पोलिसांची शिष्टाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:31+5:302021-09-04T04:49:31+5:30
ग्रामपंचायतच्या ताला ठोको आंदोलनादरम्यान ग्रामसचिवाविरोधात घोषणाबाजी झाली. सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पी.के. चोपडेंसह ग्रामपंचायत सदस्य जमले होते, ...

ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलनात पोलिसांची शिष्टाई
ग्रामपंचायतच्या ताला ठोको आंदोलनादरम्यान ग्रामसचिवाविरोधात घोषणाबाजी झाली.
सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पी.के. चोपडेंसह ग्रामपंचायत सदस्य जमले होते, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माजी जि.प. सदस्य उषाबाई माणिकराव गरकळ, माजी जि.प. सदस्य डिगांबर चोपडे, वंचितचे अनिल गरकळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष जायभाये, गजानन सानप, गजानन देठणकर, विजय चोपडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ ग्रामपंचायत पुढे जमले. यावेळी सचिव ए. के. भुसारी कार्यालयात होते. यावेळी भुसारी यांना बाहेर बोलावत, सतत गैरहजर राहणे, भ्रमणध्वनी बंद ठेवणे, गावातील साथ रोगाचे थैमान माजले आहे, ग्रामपंचायत ठराव वाचून गावातील विकासात्मक कामे प्रभावित झालेली असल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकण्याची वेळ आल्याचे आंदोलक सांगत होते. वातावरण चिघळण्याची शक्यता पहाता. रिसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र गवई, बीट जमादार अनिल कातडे यांनी वेळीच शिष्टाई करीत आंदोलकांना शांत केले. त्यामुळे ग्रामपंचायतचा ताला उघडण्यात आला. यावेळी रवींद्र आढाव, ज्ञानेश्वर क्षीरसागर, भगवान डोंगरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.
----------
कोट: भर जहागिर ग्रामपंचायत सचिव सतत गैरहजर असल्याने गावातील विकासकामे प्रलंबित आहेत. यासाठी सचिव एन.के. भुसारी यांना वेळोवेळी तोंडी-लेखी सूचना केल्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने आज ताला ठोको आंदोलन करण्यात आले.
-उषाबाई माणिकराव गरकळ
माजी जि. प. सदस्य, भर जहागिर