गोळीबार प्रकरणातील आठही आरोपींना पोलिस कोठडी
By Admin | Updated: September 4, 2014 23:04 IST2014-09-04T23:04:55+5:302014-09-04T23:04:55+5:30
अमानवाडी घाटातील गोळीबार; आठही जणांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडी.

गोळीबार प्रकरणातील आठही आरोपींना पोलिस कोठडी
वाशिम : जउळका रेल्वे पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अमानवाडी ते माळेगाव दरम्यानच्या घाटात भरदिवसा सोनारावर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आठही जणांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ४ सप्टेंबर रोजी न्यायाधिशांनी दिले.
अकोला जिल्ह्यातील धाबा येथील येथील सोनार संतोष वाटाने हा १३ ऑगस्ट रोजी अमानवाडी येथे भरणार्या आठवडी बाजाराच्या निमीत्ताने आपला माल घेवून विक्रीसाठी जात होता. माळेगाव ते अमानवाडी दरम्यानच्या घाटातून भर दूपारी तो जात असतांना त्याच्यावर पाठिमागून गोळीबार झाला होता. या गंभीर व थरारक घटनेप्रकरणी हरकतीत आलेल्या पोलिसांनी तपासचकक्रे वेगाने फिरवीली होती. अकोला शहर पोलिसांनी याप्रकरणी राजकुमार उर्फ राज यादव हरिहर पेठ अकोला, उमेश जोंधळे लोहगड ता. बार्शिटाकळी, उमेश सोळंके कोळसा ता. बाळापूर, अमोल साळवे क्रांतीनगर शिवणी शिवार, अमोल जामनीक बार्शिटाकळी, पवन गावंडे बाळापूर रोड अकोला, राहूल शर्मा जुने शहर अकोला, भिका मुळे सावना ता. मेहकर या आठ जणांना अटक केली होती. यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जीवंत काडतूस, काळ्य़ा रंगाची यामाह व लाल रंगाची बजाज दूचाकी जप्त केली होती. अकोला पोलिसांकडून आठही जणांना ताब्यात घेतल्यानंतरच्या तपासात २ खाली काडतूस सापडले आहेत. ताब्यात घेतलेल्या आठही आरोपिंचा अमानवाडी माळेगाव दरम्यान धाबा येथील सोनारावर झालेल्या गोळीबारप्रकरणाशी संबंध असल्याची दाट शक्यता जउळका रेल्वेचे ठाणेदार प्यारसिह मानलवी यांनी व्यक्त केली.