नकली सोने प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी
By Admin | Updated: September 18, 2014 01:19 IST2014-09-18T01:19:45+5:302014-09-18T01:19:45+5:30
वाशिम शहरातील व्यापा-यास गंडविण्याचा केला होता प्रयत्न.

नकली सोने प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी
वाशिम : अल्प दरात सोन्याची विक्री करावयाचे अमिष दाखवून नागरिकांना लुटणारी तिघांची टोळी वाशिम शहर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी जेरबंद केली. या तिनही आरोपिला १७ सप्टेंबर रोजी वाशिम येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधिशांनी २0 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
वाशिम शहरामध्ये असलेल्या शोले स्विट मार्टचे संचालक संतोष व्यास यांना बनावट सोन्याच्या बांगड्या दाखवून फसवणुक करण्याचा प्रयत्न करणार्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाला यश आले. तिन आरोपीमध्ये लोणी ता. मेहकर येथील सखाराम बाळाजी भोसले, गुलचंद पवार व बरदळा ता. चिखली येथील विलास प्रकाश पवार यांना अटक केली. या तिघांविरूध्द भादंविचे कलम ४२0 व ३४ अन्वये १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला.या तिनही आरोपिंना तपास अधिकारी हिवरकर यांनी १७ सप्टेंबर रोजी वाशिम येथील न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने तिघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.