अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: May 22, 2017 19:26 IST2017-05-22T19:26:23+5:302017-05-22T19:26:23+5:30
शिरपूरजैन (वाशिम) : बेलखेड येथील १६ वर्षीय मुलीस पळवून नेणाऱ्या पांगरी नवघरे येथील अश्विन यादव वानखेडे या २१ वर्षीय युवकास पोलिसांनी अकोला येथून २२ मे रोजी मुलीसह ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या बेलखेड येथील १६ वर्षीय मुलीस पळवून नेणाऱ्या पांगरी नवघरे येथील अश्विन यादव वानखेडे या २१ वर्षीय युवकास अकोला येथून २२ मे रोजी मुलीसह ताब्यात घेण्यात आले.
संबंधित मुलीस वानखेडे याने ३ मे रोजी पळवून नेले होते. मुलीच्या आईने याबाबत शिरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी मुलासह मुलीचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान, आरोपी मुलगा व पळवून नेलेल्या मुलीचे मोबाईल लोकेशन अकोला येथे मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक गणेश मुपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २२ मे रोजी सकाळी आरोपीसह मुलीला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध अगोदरच कलम ३६३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल असून यासंदर्भात अधिक तपास शिरपूर पोलिस करित आहेत.