पोलिस अन् गणेश मंडळे झाली ‘अलर्ट’
By Admin | Updated: September 3, 2014 21:30 IST2014-09-03T00:32:28+5:302014-09-03T21:30:19+5:30
लोकमत स्टींग ऑपरेशनचा प्रभाव; वाशिम पोलिस विभाग,गणेश मंडळे झाला अलर्ट.

पोलिस अन् गणेश मंडळे झाली ‘अलर्ट’
वाशिम : गणरायांच्या मुर्तीची सुरक्षितता जपण्याबाबत पोलिस यंत्रणा थोडी गाफीलच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने उघड केले होते. ३0 ऑगस्टच्या रात्री १0 ते १ वाजेदरम्यान लोकमत चमूने, वाशिम शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या मंडपांच्या पाहणीतून हा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात पोलीस प्रशासनाच्यावतिने चर्चा करून १ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत व २ सप्टेंबर रोजी प्रत्येक मंडळाला पोलीस भेट डायरी देवून गणरायाच्या सुरक्षिततेची दखल घेण्यात आली. याला गणेश मंडळानेही प्रतिसाद देवून मंडळाच्यावतिनेही दखल घेण्याचे आश्वासन दिले.
वाशिम शहरात ५२ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला जात असल्याचा दावा पोलिस प्रशासन करीत असते. वाशिम शहरातील गणरायांच्या मूर्ती रात्रीच्या सुमारास किती सुरक्षित आहेत, रात्रीची पोलिस गस्त व पोलिस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांची निगराणी कशी आहे, याची पडताळणी करण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या शहरातील विविध भागाच्या मंडपांची पाहणी करण्यात आली. यावेळी ६ गणेश मंडळातर्फे कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले होते. याचे सचित्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी ताबडतोब संबधितांना पाचारण करून यावर चर्चा केली. चर्चेत प्रत्येक गणेश मंडळाजवळ एक डायरी ठेवण्याचे ठरविण्यात आले. या डायरीवर रात्रीच्यावेळी कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी या भागात जावून संपूर्ण पाहणी केल्यानंतर यावर शेरा लिहणार आहे. तसेच प्रत्येक गणेश मंडळ पदाधिकार्यांना सुध्दा याबाबत कल्पना देण्यात आली असून मंडळानी ही जागृत राहण्याचे पोलीस विभागाने कळविले आहे. पोलीसांनी गणेश मंडळांना भेट देवून डायरी व सूचना केल्याने पोलीस गणरायाच्या सुरक्षिततेबाबत जागृत असल्याचे दाखवून दिले. जेव्हा पोलीस विभागाचे कर्मचारी गणेश मडळाला डायरी देण्यासाठी गेले तेव्हा मंडळाने लोकमतमुळे हा उपक्रम सुरू झाला यामुळे सदर कर्मचार्यांजवळ बोलून दाखविल्याचे डायरी देणार्या कर्मचार्यांनी सांगितले.
*लोकमतचे कौतूक
गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी व कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरीता २ सप्टेंबर रोजी वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या शांतता समितीच्या बैठकीत मान्यवरांनी लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून होणार्या अनुचित प्रकाराबाबत अवगत केल्याबद्दल लोकमतचे कौतूक केले.