शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

PM Kissan Scheme : १.८८ लाख शेतकऱ्यांना मिळतेय प्रत्येकी दोन हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:27 IST

PM Kissan Scheme: सातव्या हप्त्याचे प्रत्येक दोन हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पीएम (प्रधानमंत्री) किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १.८८ लाख शेतकऱ्यांसाठी सातव्या हप्त्याचे प्रत्येक दोन हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. बँकेतून ही रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकांकडे धाव घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांना या योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत समप्रमाणात दिले जाते. वर्षातील पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान पाठविला जातो. आधार कार्ड, बँक खाते, सातबारा उतारा व रहिवाशी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या आधारे संकेतस्थळावर माहिती अपलोड झालेल्या जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या १ लाख ९९ हजार ३३३ आहे. यापैकी जवळपास १२ हजार शेतकरी अपात्र ठरले आहेत. यंदा कोरोनाच्या काळात मे महिन्यापासून या वर्षातील पहिला हप्ता तर योजना लागू झाल्यापासूनचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.  ही रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये गर्दी होत असल्याचे दिसून येते. 

शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा !ऐन खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या वेळी दोन हजार रुपये असल्याने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या काळात बँकांमध्ये गर्दी होत असल्याने पैसे काढण्यासाठी जात असताना, शेतकऱ्यांमध्ये कोरोनाची थोडी धाकधूकही आहे. बँकांमधील या गर्दीतून कोरोना संसर्ग तर होणार नाही, अशी भीतीही असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हजार रुपये संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. बँकेत गर्दी होणार नाही, याचे नियोजन करून बँक खात्यातील पैसे काढावे. प्रत्येकाकडून कोरोनाविषयक नियमाचे पालन झाले, तर इतरांना संसर्ग होणार नाही.- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाwashimवाशिमFarmerशेतकरी