पीक विमा योजनेत लूट
By Admin | Updated: September 1, 2014 00:43 IST2014-09-01T00:33:15+5:302014-09-01T00:43:38+5:30
पीक विमा योजनेत लूट; मानोरा येथील शेतकर्यांचा आरोप : पाच वर्षाच्या हिशोबाची मागणी.

पीक विमा योजनेत लूट
मानोरा : शेतकर्यांच्या हिताकरिता आणि संरक्षणाकरिता राबविण्यात येणारी पीक विमा योजना शेतकर्यांच्या हिताची नसून लुबाडणारी व फसवणूक करणारी योजना असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. लालुच दाखवून आपली फसवेगिरी केली जात असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. मागील पाच वर्षात शेतकर्यांची विम्याच्या नावे दिलेल्या रकमेचा हिशेब पाहून विम्याची रक्कम किती देण्यात आली व कोणाला देण्यात आली, त्यांची नावे जाहीर करण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शासन आणि विमा कंपनीने साठगाठ करून लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे. पीक विमा योजना ही शेतकर्यांची फसवणूक करणारी योजना असून याकडे शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकरी पिकविम्याची रक्कम भरतो. दरवर्षी शेतकर्यांचे काही ना काही नुकसान होते. पण शेतकर्यांना विम्याचा लाभ म्हणून काहीही मिळत नाही. ज्या शेतात सतत तीन वर्ष नुकसान झाले असेल किंवा त्या परिसराची आणेवारी सतत तीन वर्ष ५0 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल त्याला पीक विमा योजनेचा लाभ देता येईल असे बोलले जाते. शेतकर्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामात पूर, अतवृष्टी, रोग व किडीेच उत्पन्न नाहीसे झाल्यास याचे लाभ मिळणार असल्याचे सांगीतले. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभाग शेतकर्यांना आवाहन करते. त्यामुळे कृषी विभागाचे धोरण असेल तर शेतकर्यांचे नुकसान झाल्यास निश्चित पीक विम्याचा लाभ मिळेल, अशी हमी देण्यात यावी. शेतकर्यांची फसवणूक व लुबाडणूक करून सर्वच मालामाल झाले आहेत व होत आहेत. विमा कंपनीने शेतकर्यांकरिता आखलेली पीकविमा योजना सुद्धा कृषी विभाग, शासन आणि विमा कंपनीद्वारे लुबाडण्याचीच सुनियोजित योजना असल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.