इचा पोच मार्गाची दुर्दशा
By Admin | Updated: July 30, 2014 00:39 IST2014-07-30T00:39:43+5:302014-07-30T00:39:43+5:30
पोच मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने शिवभक्तांना पायदळी प्रवास करतांना खड्डामय रस्त्याचा त्रास सहन करावे लागत आहे

इचा पोच मार्गाची दुर्दशा
मंगरुळपीर : तालुक्यातील ग्राम इचा येथील पोच मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने शिवभक्तांना पायदळी प्रवास करतांना खड्डामय रस्त्याचा त्रास सहन करावे लागत आहे संबधीतांनी त्वरीत रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे ङ्म्रावण मासानिमित्त इचा येथील जागृत शिवपार्वती मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी इचा पोच मार्गाचा अवलंब करावा लागतो या मार्गावर ठिक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असुन पायदळी सुध्दा चालता येत नाही ङ्म्रावण महिण्या निमित्त तालुक्यातील महिला तसेच पुरूष शिवभक्त दर्शनासाठी मोठय़ा संख्येनी जात असतात त्यांच्या या प्रवासात पाण्यानी भरलेली डबके त्रासदायक ठरत असल्याने महिला भक्त मंडळी मध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे संबधीतांनी सदर रस्त्यावरील पडलेले खड्डे विनाविलंब बुजवावे अशी मागणी होवु लागली आहे.