प्लास्टिक ताडपत्र्याची विक्री जोरात

By Admin | Updated: May 22, 2014 23:37 IST2014-05-22T20:54:37+5:302014-05-22T23:37:32+5:30

प्लास्टिक ताडपत्र्याची विक्री जोरात

Plastic Treadmill Sale Soldier | प्लास्टिक ताडपत्र्याची विक्री जोरात

प्लास्टिक ताडपत्र्याची विक्री जोरात

वाशिम : पावसाळा सुरु होण्याचे संकेत आल्याने घराच्या छपरांची डागडुजी करण्यासोबतच पावसापासून बचाव करता यावा यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्र्यांच्या खरेदीला वेग आला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार मानसूनला सुरुवात होत आहे. घराच्या छपरांची डागडुजी युद्धस्तरावर केल्या जात आहे. पावसापासून घराचे संरक्षण करण्यासाठी काही घरावर परंपरागत मातीचे कौलारु, इंग्रजी कौल, टिनपत्रे यासह प्लास्टिक ताडपत्र्यांचा वापर केला जातो. बहुतांश गरीब व सामान्य कुटुंबात परिस्थितीमुळे मातीचे कौलारु टाकणेसुद्धा बिकट असते. अशावेळी पावसापासून बचाव करता यावा, यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्र्या कुडामातीच्या घरावर टाकून कशीबशी पावसाळय़ापासून सुटका केली जाते. पावसाचे वेध लागतात प्लास्टिक ताडपत्र्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी दुकानावर पहावयास मिळते. प्लास्टिक ताडपत्र्यांची विक्री लक्षात घेता दुकानदारांनी विविध रंगात ताडपत्र्या विक्रीस आणल्या आहेत. पिवळय़ा, काळय़ा, पांढर्‍या, निळय़ा रंगातील या प्लास्टिक ताडपत्रीला प्रतिमिटर ७0 ते ८0 रुपये मोजावे लागतात. काळय़ा रंगातील ताडपत्र्या ४0 ते ६0 रुपये मिटर तर पांढर्‍या रंगाच्या ताडपत्र्यांना ११५ ते १२५ रुपये प्रतिमिटर मोजावे लागतात. काळय़ा व पांढर्‍या प्लास्टिक ताडपत्र्या खरेदी करणार्‍यांवर ग्राहकांचा कल अधिक असल्याचे दिसून येते. पावसाळा ऋतुत विकल्या जाणार्‍या प्लास्टिक ताडपत्री व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. प्लास्टिक ताडपत्रीचा वापर केवळ घर किंवा छतापुरता र्मयादित नसून शेतकरी आपल्या मालाचा पावसापासून बचाव करण्यासाठी सुद्धा करतात.पावसाच्या आगमनापूर्वीच रस्त्याच्या कडेला असलेले फळविक्रेते, पानठेले, हातगाडी चालक, पालेभाजी विक्रेते यांच्यासह फुटपाथावर व्यवसाय करणारे सुद्धा या प्लास्टिक ताडपत्र्या खरेदी करताना दिसत आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी प्लास्टिकच्या ताडपत्र्यांचे दर प्रतिमिटर पाच ते दहा रुपयाप्रमाणे वाढले आहे. लवकरच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याने शेतकर्‍यांसह घरगुती वापरासाठी सुद्धा प्लास्टिक ताडपत्र्यांच्या खरेदीने जोर पकडला आहे.

Web Title: Plastic Treadmill Sale Soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.