रामराव महाराजांच्या जयंतीदिनी हजार वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:33+5:302021-06-29T04:27:33+5:30

यावेळी बोलताना महंत जितेंद्र महाराज म्हणाले की, गोरसेना, गोरसीकवाडीने समाजातील गोरगरीब, वंचितांची सेवा करावी. त्यांच्या आत्मसन्मानासाठी अविरत कार्य करावे, ...

Planting of a thousand trees on the birth anniversary of Ramrao Maharaj | रामराव महाराजांच्या जयंतीदिनी हजार वृक्षांची लागवड

रामराव महाराजांच्या जयंतीदिनी हजार वृक्षांची लागवड

यावेळी बोलताना महंत जितेंद्र महाराज म्हणाले की, गोरसेना, गोरसीकवाडीने समाजातील गोरगरीब, वंचितांची सेवा करावी. त्यांच्या आत्मसन्मानासाठी अविरत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अरुण चव्हाण यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना शीख धर्मातील पंचप्यारे बलविंदरसिंग यांचे उदाहरण देत, गोरसेनेच्या माध्यमातून समाजास समर्पित होण्याचे आवाहन केले. विलास रामावत यांनीही आपले विचार व्यक्त केले.

यावेळी महंत खुशाल महाराज, टी.आर. महाराज, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, नेमीचंद चव्हाण, सुरेश राठोड, कैलास जाधव, रामाराव राठोड, रोहिदास पवार, नेमीचंद महाराज, सुरेश जाधव, एल.डी. चव्हाण, दिनेश राठोड, प्रेमचंद रामावत, प्रा. अरुण पवार, अनिल सांगावत, नामदेव पवार, प्रा. रमेश गोलानी, श्रीकांत राठोड, विजय राठोड, जयवंत राठोड, प्रा. विशाल जाधव, पंडित राठोड, अनिल राठोड, पंजाबराव चव्हाण, राहुल राठोड, राजसंग राठोड, सुभाष रामावत, बाळू राठोड उपस्थित होते.

Web Title: Planting of a thousand trees on the birth anniversary of Ramrao Maharaj