पेरणीवरून वाद; कु-हाडीने मारहाण

By Admin | Updated: June 19, 2017 04:16 IST2017-06-19T04:16:50+5:302017-06-19T04:16:50+5:30

मालेगाव तालुक्यातील घटना.

Planting on sowing; Suffering from bone | पेरणीवरून वाद; कु-हाडीने मारहाण

पेरणीवरून वाद; कु-हाडीने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील राजुरा येथे शेतात पेरणीसाठी गेले असता कुर्‍हाडीने वार करून एकास जखमी केल्याची घटना १८ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
राजुरा येथील भाऊराव देवबा नागरे यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दिली, की ते शेतात पेरणीसाठी गेले असता, राजुरा येथील गोपीनाथ बबन उगले यांनी शेतात वखर का हाणला, असे विचारून त्यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून जखमी केले. वृत्त लिहिस्तोवर मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Planting on sowing; Suffering from bone