शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी वटवृक्षांचे रोपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 3:45 PM

वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले.

  वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून २६ जून रोजी एसएमसी इंग्लिश स्कूल परिसरात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येत असल्यामुळे बºयाच प्राण्यांना व पक्ष्यांना अन्न मिळते. फळे खाण्यासाठी शेकडो पक्षी वटवृक्षावर जणू तुटुनच पडतात. तसेच बरेच प्राणी व पक्षी वडाच्या झाडाचा निवा-यासाठी उपयोग करतात. वटवृक्ष हा एक संपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण आहे. या वृक्षाला फुटणाºया परिसंस्था त्यांचे स्वतंत्र वृक्षात रुपांतर होउन त्याला मिळणारे दीघार्युष्य या गुणधर्मामुळे त्याला ‘अक्षय वृक्ष’ असेही म्हटले जाते. आजच्या काळात ब-याच विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडाचे झाड हळूहळू वाढते. आजच्या गतिमान जगामध्ये बहुतेकजण लागवडीसाठी जलद वाढणा-या व शोभीवंत वृक्ष प्रजातीची निवड करतात. त्यामुळे पुरातन काळात जतन करण्यात आलेल्या या वृक्षांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. आपल्या पुर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखुन संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्याने वटपूजा करण्याची प्रथा रूढ केली. पुर्वीच्याकाळी स्त्रिया वडाच्या झाडाच्या ठिकाणी जावून वटपूजा करीत असत. तथापि आता वडांच्या झाडांची संख्या कमी झाल्याने वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची पद्धत रुढ होत आहे. ही बाब वटपौर्णिमा साजरी करण्याच्या मुळ उद्देशासाठी पूर्णत: विसंगत असुन त्यामुळे उलट वडांच्या झाडांची बेसुमार छाटनी होते. या अनिष्ठ प्रथेला आळा घालण्यासाठी एसएमसी इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षिका प्रतीक्षा कान्हेड,  भाग्यश्री ठोके, स्नेहल राऊत, राधिका बेदरकर, वर्षा पाटील तसेच राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थींच्या हस्ते वटपौर्णिमेला वटवृक्षारोपण केले जाते. जनजागृती म्हणून २६ जून रोजीदेखील वटवृक्षारोपण करण्यात आले तसेच या वटपौर्णिमेला पर्यावरण्याच्या दृष्टिने वडाला असलेले महत्व लक्षात घेउन वडाच्या फांद्या न तोडता वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत जोशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी