जन शिक्षण संस्थानतर्फे उकळीपेन येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST2021-07-27T04:43:52+5:302021-07-27T04:43:52+5:30
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारद्वारा पुरस्कृत जन शिक्षण संस्थानच्या वतीने शनिवारी उकळीपेन येथे वृक्षारोपण करण्यात आले. ...

जन शिक्षण संस्थानतर्फे उकळीपेन येथे वृक्षारोपण
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारद्वारा पुरस्कृत जन शिक्षण संस्थानच्या वतीने शनिवारी उकळीपेन येथे वृक्षारोपण करण्यात आले.
भारत सरकारव्दारे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम जन शिक्षण संस्थानचे संचालक शोएब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम अधिकारी के. के. अंभोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात जन शिक्षण संस्थानबद्दल माहिती देऊन वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अन्नपूर्णा भोयतवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन जैताडे, नितीन जैताडे उपस्थित होते. नंदा अरूण चव्हाण, चंद्रकला वाघमारे, शारदा गांजरे, मंगला कांबळे, सरला अंभोरे, गोदावरी अंभोरे, सचिन भगत, सलीम शेख, बाबूराव इंगोले, जयराम भोयर, दत्ता जैताडे, निरंजन गांजरे व इतर मंडळी उपस्थित होती. आभार जन शिक्षण संस्थानचे अंभोरे यांनी मानले.