समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत फळबाग लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:11+5:302021-09-13T04:41:11+5:30
---------- रस्त्याच्या डागडुजीची मागणी वाशिम: वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहागीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. ...

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत फळबाग लागवड
----------
रस्त्याच्या डागडुजीची मागणी
वाशिम: वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहागीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे एखाद्या वेळी मोठा अपघात घडून जीवित हानी होण्याची भीती आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
^^^^^^^^^
रस्त्यावरील पथदिवे दुरुस्तीची मागणी
वाशिम: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन खेडेगावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
---------------
पीक नुकसानभरपाईची मागणी
वाशिम : गतवर्षी जुलै महिन्यात अतिपावसामुळे मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी महसूल व कृषी विभागाकडे केली.