बोहल्यावर चढण्यापूर्वी केले वृक्षारोपण
By Admin | Updated: June 17, 2017 00:40 IST2017-06-17T00:40:39+5:302017-06-17T00:40:39+5:30
मंगरूळपीर: येथे १५ जून रोजी सहकार भवनात आयोजित विवाह सोहळ्यादरम्यान बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम पार पाडण्यात आला.

बोहल्यावर चढण्यापूर्वी केले वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: येथे १५ जून रोजी सहकार भवनात आयोजित विवाह सोहळ्यादरम्यान बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम पार पाडण्यात आला. यायोगे नवदाम्पत्यांनी वृक्षलागवड, संवर्धनाचा संदेश दिला.
गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वसाहतीमुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, पर्यावरणाचा समतोल बिघडून ऋृतुमानात बदल होत असून, निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होऊन जीवन धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, हा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रवीण कांबळे व अस्मिता इंगोले यांच्या विवाह सोहळ्यादरम्यान नवदाम्यत्याने मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले.