दिवाळीसाठी महामंडळाचे अतिरिक्त बसेसचे नियोजन

By Admin | Updated: October 23, 2014 01:05 IST2014-10-23T00:21:09+5:302014-10-23T01:05:04+5:30

राज्यात १७५५0 बसेस : अमरावती विभागात ८७५ बसेस.

Planning of additional buses for the corporation for Diwali | दिवाळीसाठी महामंडळाचे अतिरिक्त बसेसचे नियोजन

दिवाळीसाठी महामंडळाचे अतिरिक्त बसेसचे नियोजन

वाशिम : दिवाळी सणानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी ह्यकॅशह्ण करण्यासाठी एस.टी. महामंडळाने अतिरिक्त बसेसचे नियोजन केले आहे. राज्यभरातून १७ हजार ५५0 अतिरिक्त बसेस दिवाळीदरम्यान धावणार असून यामध्ये अमरावती विभागातील ८७५ बसेसचाही समावेश राहणार आहे. गतवर्षी राज्यभरातून दिवाळीनिमित्त १४ हजार ८६0 अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही गर्दीमुळे प्रवाशांना गैरसोयीचाच सामना करावा लागला होता. गतवेळचा अनुभव लक्षात घेता यावर्षी २६९0 बसेस वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीकरिता महामंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवाशांना कुठूनही आरक्षण करता येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागातून ७७५, अमरावती विभागातून ८७५, नाशिकमधून ३३७५, पुणे ४५७५, औरंगाबाद ४७00, मुंबई प्रादेशिक विभागातून ३२५0 अशा एकूण १७ हजार ५५0 अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत तैनात करण्यात आल्या आहेत. ही सेवा १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान सुरू राहणार आहे. अमरावती विभागातील अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात ७५, अमरावती १५0, यवतमाळ १00 आणि बुलडाणा जिल्ह्यासाठी ५५0 अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी हाच आकडा २४0 होता. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४0, अकोला व वाशिम जिल्ह्यात ६0, बुलडाणा ८0 तर यवतमाळ जिल्ह्याला ६0 अतिरिक्त बसेस मिळाल्या होत्या.

Web Title: Planning of additional buses for the corporation for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.