डुकरांचा उडीद पिकांत हैदाेस ; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:03+5:302021-09-24T04:48:03+5:30
अपघातग्रस्त विद्युत खांब सरळ करा वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागांत शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी उभारलेले वीजखांब पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ...

डुकरांचा उडीद पिकांत हैदाेस ; शेतकरी त्रस्त
अपघातग्रस्त विद्युत खांब सरळ करा
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागांत शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी उभारलेले वीजखांब पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झुकले आहेत. एखाद्यावेळी खांब कोसळल्यास अपघाताची भीती असल्याने हे खांब सरळ करण्याची मागणी होत आहे.
पंचाळा ते पोहरादेवी रस्ता नादुरस्त
वाशिम : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशात ख्यातनाम असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवीला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेषतः पंचाळा फाटा ते पोहरादेवी हा रस्ता मोठ्या प्रमाणात नादुरस्त झाला असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची पंचाईत झाली असून भाविकांची गैरसोय होत आहे.
पावसामुळे शेततळे काठोकाठ भरले
वाशिम : जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत २०१८-१९ मध्ये ६१ गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली. यात बहुतांश गावांत शेततळ्यांची कामही श्रमदानातून करण्यात आले. सोमवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे हे सर्वच शेततळे काठोकाठ भरले आहेत.
राेहिंद्वारे पिकांचे नुकसान
वाशिम : खरीप हंगामातील पिके काढणीवर आली असताना वन्य प्राणी पिकांवर ताव मारत आहेत. त्यात रोहिंचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून पिके फस्त करुन नुकसान करताहेत