पीएचसी, ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:23+5:302021-09-07T04:50:23+5:30

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्याप रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी-सुविधांची उणीव आहे. पुरेशा प्रमाणात कर्मचारी व डॉक्टर नाहीत. महिला डॉक्टरांचा मोठा ...

PHC, in the throes of rural hospital problems | पीएचसी, ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात

पीएचसी, ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्याप रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी-सुविधांची उणीव आहे. पुरेशा प्रमाणात कर्मचारी व डॉक्टर नाहीत. महिला डॉक्टरांचा मोठा अनुशेष आहे. ग्रामीण भागातील एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यासाठी लागणारी रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही.

....................

आरोग्यविषयक सुविधांचा फज्जा

शासकीय रुग्णालयांसंबंधीचे काही नियम आहेत. त्यात किमान पाच हजार नागरिकांच्या मागे एक समुदाय आरोग्य अधिकारी, एक आरोग्य सेवक, एक आरोग्य सेविका, मदतनीस असा कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे. याशिवाय दर हजार नागरिकांमागे एक आशा वर्कर, एक अंगणवाडी सेविका व मदतनीस असावी, असाही नियम आहे. प्रत्यक्षात मात्र ५० ट्क्क्यांपेक्षा अधिक पदे रक्त असून आरोग्यविषयक सुविधांचा फज्जा उडत आहे.

....................

कोट :

गेल्या अनेक वर्षांपासून मानोरा तालुक्यात आरोग्यविषयक सुविधांची पूर्तता झालेली नाही. रुग्णांचे यामुळे हाल होत आहेत. शहरी भागाला जोडणारे ग्रामीण रस्ते चिखलाने माखले आहेत. यामुळे विशेषत: रुग्णांची आबाळ होत आहे.

शाम अशोकराव पवार

तालुकाध्यक्ष, प्रहार, मानोरा.

...............

मानोरा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. माहेवारी औषधी साठा जेवढा प्राप्त होतो, तेवढा वाटप केला जातो. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविले जाईल.

- डॉ. वैभव खडसे

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मानोरा.

Web Title: PHC, in the throes of rural hospital problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.