जिल्ह्यात शेती अवजारे, उपकरणांची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST2021-05-18T04:43:25+5:302021-05-18T04:43:25+5:30
या आदेशानुसार जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी शेती अवजारे व उपकरणांची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच ...

जिल्ह्यात शेती अवजारे, उपकरणांची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा
या आदेशानुसार जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी शेती अवजारे व उपकरणांची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच केवळ बँकांच्या संबंधित व्यवहारासाठी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, या केंद्रांवर इतर कोणत्याही सेवा देता येणार नाहीत. एलआयसी कार्यालयाच्याअंतर्गत कामकाज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. मात्र, ग्राहकांसाठी सेवा बंद राहील.
सनदी लेखापाल (सीए) यांची कार्यालये कमीत कमी मनुष्यबळामध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत फक्त अंतर्गत कामासाठी सुरु राहू शकतील. ग्राहकांना कार्यालयात जाता येणार नाही. केंद्रीय भांडार निगमचे कर्मचारी, हमाल यांना ओळखपत्र जवळ ठेवण्याच्या अधीन राहून त्यांच्या कामासाठी जाण्याची मुभा राहील. याशिवाय बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी इंडियन पोस्ट पेमेंटस बँकेच्या सेवेचा उपयोग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.