पारंपरिक गुढीऐवजी अनेकांनी घरांवर फडकविला भगवा झेंडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 15:33 IST2018-03-18T15:33:54+5:302018-03-18T15:33:54+5:30
ही घडामोड जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरल्याचा सूर अनेकांमधून उमटत आहे.

पारंपरिक गुढीऐवजी अनेकांनी घरांवर फडकविला भगवा झेंडा!
वाशिम : सण, उत्सव कोण कोणत्या प्रकारे साजरा करतो, हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत विषय आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात रविवारी गुढीपाडवा हा सण ठिकठिकाणी अत्यंत हर्षोल्लासात साजरा झाला. मात्र, यादिवशी काडी, साडी, त्यावर उलटा तांब्या अशा पारंपरिक पद्धतीने गुढी न उभारता अनेकांनी आपल्या घरांवर एकपाती भगवा ध्वज फडकविल्याचे चित्र दिसून आले.
गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मरण करून अनेकांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून घरावर पारंपरिक गुढीऐवजी भगवा झेंडा लावला होता. ही घडामोड जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरल्याचा सूर अनेकांमधून उमटत आहे.