मास्क न वापरल्याबद्दल दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:45 IST2021-08-27T04:45:06+5:302021-08-27T04:45:06+5:30

००००००००००००० ग्रामीण भागात ग्रामसेवकांचे अपडाऊन वाशिम : पावसाळ्याच्या दिवसातही ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामसेवक हे मुख्यालयी न राहता अपडाऊन करीत ...

Penalty for not using mask! | मास्क न वापरल्याबद्दल दंड!

मास्क न वापरल्याबद्दल दंड!

०००००००००००००

ग्रामीण भागात ग्रामसेवकांचे अपडाऊन

वाशिम : पावसाळ्याच्या दिवसातही ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामसेवक हे मुख्यालयी न राहता अपडाऊन करीत असल्याने कामे खोळंबत आहेत. ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याबाबत निर्देशित करण्याची मागणी होत आहे.

००००

अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

वाशिम : मेडशी, किन्हीराजा, शिरपूर परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती; मात्र वाढत्या अतिक्रमणामुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

०००००

मालेगाव बसस्थानकात सुविधांचा बोजवारा

वाशिम : मालेगाव येथील तहसील कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या बसस्थानकात विविध समस्या उद्भवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसस्थानक परिसरात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी विनोद गायकवाड यांनी केली.

०००००

शासकीय इमारतीची दुरुस्ती रखडली

वाशिम : शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य व कृषी अधिकारी कार्यालय यासह काही कार्यालये जीर्ण झाली. दुरुस्ती आवश्यक ठरत आहे.

Web Title: Penalty for not using mask!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.