मास्क न वापरल्याबद्दल दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST2021-06-09T04:50:46+5:302021-06-09T04:50:46+5:30

अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी शेलूबाजार : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम या गौणखनिजाची खदान आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील या जमिनीतून ...

Penalty for not using mask! | मास्क न वापरल्याबद्दल दंड!

मास्क न वापरल्याबद्दल दंड!

अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी

शेलूबाजार : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम या गौणखनिजाची खदान आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील या जमिनीतून अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. हे थांबविण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जिल्हा हिवतापची इमारत जीर्ण

वाशिम : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधाही मिळणे दुरापास्त झाले आहे. नवी इमारत मिळण्याची मागणी होत आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने कधीही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

जऊळकात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

जऊळका : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायतीने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Penalty for not using mask!