उघडयावर शौचास जाणा-यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:53 IST2017-09-21T19:50:25+5:302017-09-21T19:53:44+5:30
आसेगाव पेन : परिसरात दररोज सकाळी गुडमॉर्निग पथक गावात येवून उघडयावर शौचास जाणा-यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १८ सप्टेंबर रोजी २५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

उघडयावर शौचास जाणा-यांना दंड
ठळक मुद्देगुडमॉर्निंग पथकाची कारवाई२५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पेन : परिसरात दररोज सकाळी गुडमॉर्निग पथक गावात येवून उघडयावर शौचास जाणा-यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १८ सप्टेंबर रोजी २५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आसेगाव पेन परिसरातील रिठद, देउळगाव बंडा, बेलखेडा, पार्डी तिखे, येवता या सहा गावांमध्ये सकाळी ५.३० ते ८ वाजताच्या दरम्यान गुडमॉर्निग पथकाने भेट देवून २५ जणांवर कारवाई केली. तसेच गुडमॉर्निग पथकाच्यावतिने उघडयावर जावू नका, घरोघरी शौचालय बांधा अशा सूचना देत उघडयावरील हागणदारीमुळे होणाºया आजाराबाबत, दुष्परिणामाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.