गौण खनिज चोरी प्रकरणी दंड
By Admin | Updated: October 9, 2014 00:45 IST2014-10-09T00:45:48+5:302014-10-09T00:45:48+5:30
इ-क्लास जमीनीतून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाची कारवाई.

गौण खनिज चोरी प्रकरणी दंड
रिधोरा (वाशिम) :येथील इ-क्लास जमीनीतून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाने संबंधित इसमास ४९ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
रिधोरा परिसरातील इ-क्लास जमीनीतून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन जे.सी.बी. मशीनच्या सहाय्याने होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संदिप सावळे यांनी मालेगाव तहसीलकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने रिधोरा तलाठी व मंडळ अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन पंचासमक्ष पंचनामा केला होता. यानुसार येथील भास्कर दिनकर उगले नामक व्यक्तीने घराच्या बांधकामात सदर मुरूम वापरल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले होते. याप्रकरणी उगले यांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधी महसूल विभागाने दिली होती. परंतु त्यांनी कोणताही लेखी जबाब सादर न केल्याने नायब तहसीलदार (महसुल) आर.बी.डाबेराव यांनी ३५ ब्रास मुरुम अवैधरित्या उत्खनन केल्याचे सिध्द झाल्याने ४२ हजार रुपये तर रॉयल्टी चुकविल्याबद्दल सात हजार असा एकूण ४९ हजार रु पयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही रिधोरा ग्रामपंचायतला अवैध गौण खनीज उत्खनन प्रकरणी दिड लाख रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे.