उंबर्डा बाजार येथे शांतता समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:37 IST2021-01-18T04:37:15+5:302021-01-18T04:37:15+5:30

उंबर्डा बाजार : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ...

Peace Committee meeting at Umbarda Bazaar | उंबर्डा बाजार येथे शांतता समितीची सभा

उंबर्डा बाजार येथे शांतता समितीची सभा

उंबर्डा बाजार : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची तातडीची बैठक घेण्यात आली.

उंबर्डा बाजार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असताना प्रभाग क्र. २ व पोलीस चौकीसमोर काही किरकोळ वादविवाद घडले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या निमित्ताने तातडीची शांतता समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन धंदर यांनी गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले; तर ग्रामस्थांनीही यावेळी शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चौकी जमादार कैलास गवई यांनी कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन केले. बैठकीला गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी मंडळींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Peace Committee meeting at Umbarda Bazaar