मंडप सजावट गोडाऊनला आग

By Admin | Updated: August 9, 2014 22:43 IST2014-08-09T22:00:05+5:302014-08-09T22:43:38+5:30

शेलगाव राजगुरे येथील घटना : २0 लाख रूपयांचे नुकसान

Pavilion Decoration Godown Fire | मंडप सजावट गोडाऊनला आग

मंडप सजावट गोडाऊनला आग

शिरपूर जैन : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलगाव राजगुरे येथील जुन्या शाळा इमातीतील मंडप डेकोरेशनच्या साहित्याला आग लागून २0 लाखाचे साहित्य खाक झाल्याची घटना ८ ऑगस्टच्या रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. ही आग लागली नसुन लावल्या गेल्याची फिर्याद शेलगावचे विनोद नारायणराव वाघ यांनी पोलिसात दिल्याने याप्रकरणी शेलगाव राजगुरे येथील पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेलगाव राजगुरे येथील विनोद नारायणराव वाघ हे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करतात. त्यांच्या मंडप डेकोरेशनचे जवळपास २0 लाख रुपये किमतीचे साहित्य गावातीलच ग्रामपंचायतच्या ताब्यातील जुन्या शाळेत ठेवलेले होते. या साहित्याला गावातीलच स्वप्नील वाघ, मनोहरवाघ, भिकाराव वाघ, कौशल्या वाघ, पंचफुला वाघ यांनी ८ ऑगस्टच्या रात्री ११.३0 वाजताचे सुमारास आग लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादी विनोद नारायणराव वाघचा भाचा विलास सुभाष तायडे याला रात्रीच्या वेळी मंडपाचे साहित्य ठेवलेल्या परिसरात तो शौचास जात असतांना त्याला दिसला. त्याने याची माहिती फिर्यादिसह घरच्यांना दिली. घटनास्थळी त्यांनी धाव घेऊन लावलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले; परंतू तोवर आगीमध्ये मंडप डेकोरेशनचे जवळपास २0 लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांच्या फिर्यादिवरुन स्वप्नील वाघ, मनोहर वाघ, भिकाराव वाघ, कौशल्या वाघ, पंचफूला वाघ यांच्याविरुद्ध शिरपूर पोलिसात कलम १४३, १४७, १४९, ४३६, २९४, ५0४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.

** रिसोडचे अग्निशमन दल फेल !

मंडप डेकोरेशनच्या साहित्याला आग लावल्याचे लक्षात आल्यानंतर विनोद वाघ यांनी रिसोडच्या अग्नीशमन दलाला याबाबत माहिती दिली. परंतू रिसोडच्या अग्नीशमन दलाची गाडी नादूरु स्त असल्याने वाघ यांना वाशिमच्या अग्नीशमन दलाशी संपर्क साधावा लागला. त्यात वेळ गेला. वाशिमचे अग्नीशमन दल घटनास्थळी पोहचले खरे, परंतू तोवर आगीने वाघ यांचे पूर्ण साहित्य भस्मसात केले होते.

Web Title: Pavilion Decoration Godown Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.