महिला सरपंचाच्या पतीराजाला आता ग्रामपंचायतीत ‘नो एन्ट्री’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:05+5:302021-08-01T04:38:05+5:30
महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लुडबूड करताना दिसतात. पण,यापुढे त्यांच्या कामात त्यांचे पती अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप ...

महिला सरपंचाच्या पतीराजाला आता ग्रामपंचायतीत ‘नो एन्ट्री’ !
महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लुडबूड करताना दिसतात. पण,यापुढे त्यांच्या कामात त्यांचे पती अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप चालणार नाही. शिवाय,संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नातेवाईकांना बसताही येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या निर्णयामुळे सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही. नव्या आदेशामुळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य या पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामे स्वत: करणे गरजेचे आहे. गावाचा कारभारी म्हणून सरपंचांचा लौकिक असतो. सरपंचांचा त्याच्या गावात वेगळाच तोरा असतो. एक वेगळाच सन्मान असतो. मात्र, महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप कायम असतो.
---------
महिला सरपंच म्हणतात,
१) कोट: एखादी महिला स्थानिक पातळीवर राजकारणात येऊ पाहत असेल तर तिला कुटुंबातून आणि समाजातून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. आम्हाला कौटुंबिक कामे आहेतच. शिवाय आता राजकारणामुळे ही नवीन जबाबदारी अंगावर येऊन पडली. असे असले तरी गावाची परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी पार पाडत आहे. त्यासाठी समाजाकडून पाठिंबा मिळत आहे.
-रत्नमाला शंकर नागफासे,
सरपंच, म्हसणी
----------------
२) कोट: महिलांना आरक्षण दिले तेव्हा त्याकडे ‘जादूची कांडी’ म्हणून पाहिल्या गेले. जसे की महिला सरपंचांनी लगेच काहीतरी करून दाखवले पाहिजे, असा दृष्टिकोन ठेवला गेला. पण, नव्याने राजकारणात आल्यानंतर एका झटक्यात गावचा कारभार कसा बघणार, याचा कधी कुणी विचार केला नाही. आमच्या कामात मात्र कुटुंब किंवा पती हस्तक्षेप करीत नाहीत.
-
"
कोट: सरपंच पती, पिता, दीर, सासरा हे वास्तव आहे आणि ते नाकारून चालणार नाही. आरक्षणाची सुरुवात ज्यावेळेला झाली तेव्हा मात्र १०० टक्के बाहुल्या होत्या, त्यांना रबर स्टँप म्हटले जायचे. आता स्थिती बदलत असली तरी पती आणि कुटुंबाचा हस्तक्षेप पूर्णपणे दूर झालेला नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.
- राजाराम अवगन,
विरोधी पक्षनेता
----------
कोट: अनेक चित्रपटांतही तुम्ही असेच पाहिले असेल. कुणाची तरी बायको, सून सरपंच बनली आणि ती केवळ बाहुली बनून राहिली. हे चित्र वास्तवापासून दूर नसल्याचे आताही दिसत आहे. पत्नी सरपंच असताना पती आणि कुटुंब तिच्या कामात ढवळाढवळ करताना पाहायला मिळते. यावर नियंत्रण असायला हवे.
- किसन पाटील,
विरोधी पक्षनेता
--------
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती- ४९१
महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायती - ११३
----------
तालुका - महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायती (२०२१)
रिसोड - २७
कारंजा - १८
वाशिम - २०
मं.पीर - २०
मालेगाव - १६
मानोरा - १२
----------------------