कारखेडा विलगीकरण केंद्रातील रुग्ण काेराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:02+5:302021-05-30T04:31:02+5:30

शासनाने आदेश दिल्याने कारखेडा ग्रामपंचायतीच्यावतीने ३० बेडचा कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. त्यामध्ये गावातील तीन रुग्णांना उपचारासाठी दाखल ...

Patients at Karkheda Separation Center are free from care | कारखेडा विलगीकरण केंद्रातील रुग्ण काेराेनामुक्त

कारखेडा विलगीकरण केंद्रातील रुग्ण काेराेनामुक्त

शासनाने आदेश दिल्याने कारखेडा ग्रामपंचायतीच्यावतीने ३० बेडचा कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. त्यामध्ये गावातील तीन रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना संसर्ग काळ समाप्त झाल्यावर त्यांची रितसर तपासणी पोहरादेवी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका वनिता राठोड यांनी केली. ते रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे कारखेडच्या विलगीकरण केंद्रामधील बाधितांची संख्या निरंक आहे. यावेळी गावच्या सरपंचा सोनाली बबनराव देशमुख, उपसपंच अनिल काजळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी पुषगुच्छ देऊन निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अनिल सूर्य, जिल्हा परिषद शिक्षक रणजित जाधढवळे, मनोज किशोर तायडे, अंगणवाडी सेविका शारदा जगताप, आशा सेविका संगीता बावणे, अर्चना पाटील, कविता परांडे, शारदा मात्रे, प्रतिभा चव्हाण, वैभव कांबळे जगदीश परांडे, प्रमोद ढवळे, विजय काजळे आदी उपस्थित होते.

Web Title: Patients at Karkheda Separation Center are free from care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.