विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी पतीस पोलीस कोठडी
By Admin | Updated: March 12, 2015 02:03 IST2015-03-12T02:03:01+5:302015-03-12T02:03:01+5:30
सासरच्या मंडळीने त्रास दिल्यामुळे आत्महत्या

विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी पतीस पोलीस कोठडी
मालेगाव : सासरच्या मंडळीने त्रास दिल्यामुळे माझी मुलगी सुवर्णा मुळे हिने आत्महत्या केल्याची तक्रार वडील शिवाजी शेगसारेकर यांनी १0 मार्चला पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी पती रवींद्र मुळेला अटक करून सासरच्या ४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी पतीस न्यायालयात हजर केले असता त्याला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुवर्णाला पती रवींद्र मुळे, सासरे अशोक मुळे, सासू माया मुळे व सखाजी जाधव रा. टाकळी जि. परभणी यांनी शेती घेण्यासाठी ५ लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावित सुवर्णाचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या जाचाला कंटाळून सुवर्णाने हिवतापाच्या गोळय़ा खावून ९ मार्चच्या रात्री आत्महत्या केली. याबाबत सविस्तर, सुवर्णाचे वडील शिवाजी शेगसारेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पती रवींद्र मुळे, सासरा अशोक मुळे, सासू माया मुळे व सखाजी जाधव या चार जणांवर कलम ४९८ अ ३0४, ३0६ , ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पती रवींद्र यास अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीस विद्यमान न्यायालयात हजर केले असता त्याला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.