पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 14:42 IST2019-04-24T14:42:35+5:302019-04-24T14:42:38+5:30
अंगावर घरातील काचेच्या बॉटलमधील पेटलेला दिवा फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न करणा-या गजानन दगडू बांगरे यास पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अटक केली.

पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीस अटक
वाशिम : वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या तामसी येथील वैशाली गजानन बांगरे (वय ३० वर्षे) हिच्या अंगावर घरातील काचेच्या बॉटलमधील पेटलेला दिवा फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न करणा-या गजानन दगडू बांगरे यास पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दारू पिऊन आलेल्या गजानन बांगरे याने त्याची पत्नी वैशालीला शिवीगाळ करणे सुरू केले. त्यास प्रतिकार केला असता, त्याने रागाच्या भरात घरातील काचेच्या बॉटलमध्ये असलेला पेटता दिवा वैशालीच्या अंगावर फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाच्या पीडितेच्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविचे कलम ३०७, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेनंतर गजानन बांगरे हा फरार होता. पोलिसांनीही कसून शोध घेत त्याला २४ तासाच्या आत अटक करून गजाआड केले.