पासिंगला गेलेली रुग्णवाहिका परत मिळालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 12:11 PM2021-06-19T12:11:08+5:302021-06-19T12:11:33+5:30

Washim News : पासिंग करण्याच्या नावाखाली वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे ही रुग्णवाहिका पाठविण्यात आली.

The passing ambulance was never returned | पासिंगला गेलेली रुग्णवाहिका परत मिळालीच नाही

पासिंगला गेलेली रुग्णवाहिका परत मिळालीच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहागीर : येथून जवळच असलेल्या मोप प्राथमिक आरोग्य केंद्रास काही दिवसांपूर्वी नवी रुग्णवाहिका मिळाली; मात्र पासिंग करण्याच्या नावाखाली वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे ही रुग्णवाहिका पाठविण्यात आली. तेव्हापासून ती परत मिळालेली नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.
मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे २७ गावांचा समावेश आहे. गरोदर मातांचे बाळंतपण हे नियमानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये होणे गरजेचे असल्याने रुग्णवाहिकेची नितांत आवश्यक भासत होती. त्यानुसार, मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळालीदेखील; परंतु अवघ्या काहीच दिवसांत वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे सदर रुग्णवाहिका पासिंगच्या नावाखाली बोलावून परत पाठविलीच नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. या संदर्भात रुग्णवाहिका समन्वयक मारोती गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता, मोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावाने रुग्णवाहिका दिलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र नवी रुग्णवाहिका मिळाल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न होत आहे. हा संभ्रम यंत्रणेतील वरिष्ठांनी दूर करून मोपला रुग्णवाहिका मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्याने रूग्णवाहिका प्राप्त झाली होती. काही दिवसांपुर्वी ती वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे पासींगसाठी पाठविण्यात आली. तेव्हापासून रुग्णवाहिका परत मिळालेली नाही.
- डाॅ.अशिष सिंह वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र

Web Title: The passing ambulance was never returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.