मालवाहक वाहनांमधून प्रवासी वाहतूक

By Admin | Updated: May 26, 2014 01:30 IST2014-05-26T01:30:07+5:302014-05-26T01:30:20+5:30

वाशिम जिल्ह्यात मालवाहक वाहनात नियमबाहय़पणे खुलेआम प्रवासी वाहतूक वाहतूक केली जात आहे.

Passenger transport between cargo vehicles | मालवाहक वाहनांमधून प्रवासी वाहतूक

मालवाहक वाहनांमधून प्रवासी वाहतूक

मालवाहक वाहनांमधून प्रवासी वाहतूक वाशिम: सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात विवाह सोहळे पार पडत आहेत. या विवाह सोहळय़ांना उपस्थित राहण्यासाठी जाणार्‍या लोकांना, वर्‍हाड्यांना खासगी प्रवासी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक संख्येत बसवून किंवा ट्रक, मेटॅडोर, पीकअप व्हॅन यासारख्या मालवाहक वाहनात नियमबाहय़पणे बसवून त्यांची खुलेआम वाहतूक केली जात आहे. जिल्हय़ात सर्वच तालुक्यात हा प्रकार सुरू असून, मानोरा, तालुक्यातही अवैध प्रवासी वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात महामार्ग पोलिस व प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत वाहतूक पोलिस कार्यरत असून, अवैध व नियमबाह्य वाहतुकीस आळा घालण्यात येत नसल्याने एखादा भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांना, आरटीओंना अशा मालवाहू वाहनांमधून प्रवाशांची नियमबाह्यपणे वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. अशा वाहनांना चालान करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यापासून ते त्यांचे परवाने रद्द करण्यापर्यंतचे अधिकार असूनही अशा वाहतुकीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

Web Title: Passenger transport between cargo vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.