रिठद ग्रा.पं.मध्ये परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा तेराही जागांवर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST2021-01-21T04:36:34+5:302021-01-21T04:36:34+5:30
यंदाच्या निवडणुकीत रिठद गावात सामाजिक सलोखा ठेवत सर्व समाजाला सोबत घेऊन उमेदवारी देण्यात आली होती. जनतेने विश्वास टाकून परिवर्तन ...

रिठद ग्रा.पं.मध्ये परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा तेराही जागांवर विजय
यंदाच्या निवडणुकीत रिठद गावात सामाजिक सलोखा ठेवत सर्व समाजाला सोबत घेऊन उमेदवारी देण्यात आली होती. जनतेने विश्वास टाकून परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले. विजयी उमेदवारांत वाॅर्ड क्र. १ मध्ये देवकाबाई ज्ञानबा बोरकर, पंचफुला प्रल्हाद अंभोरे हे विजयी झाले, तर आशा बालाजी बोरकर यांची बिनविरोध निवड झाली. वाॅर्ड क्र. २ मध्ये कांताबाई शिवाजी गवई, छाया राजू आरू व वाॅर्ड क्र. ३ मध्ये गणेश विश्वनाथ आरू, मनीषा संतोष ढेंगळे, वाॅर्ड क्र. ४ मध्ये गजानन निवृत्ती आरू, संगीता संतोष अंभोरे, मुक्ताबाई पांडुरंग ठोकळ, वाॅर्ड ५ मध्ये उत्तम दत्ता आरू, मुजमिलखाँ खाजाखाँ पठाण, चित्राबाई राजाराम अंभोरे हे १३ उमेदवार निवडून आल्याने रिठद ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद झाली आहे. या पॅनलचे नेतृत्व पं.स. सदस्य गजानन आरू, सुभाष बोरकर, धनंजय बोरकर, रामेश्वर आरू, यादवराव आरू, नंदू तुकाराम आरू, बळीराम बोरकर, सुभाष प्र. आरू, प्रकाश पांडुरंग बोरकर, डॉ. यू. टी. बोरकर, डॉ. गंगाधर आरू, माजी पो.पा. शंकरराव बोरकर, डॉ. प्रकाश अंभोरे, प्रकाश खंडूजी बोरकर यांच्यासह रिठद गावकरी मंडळींनी केले. (वा.प्र.)