शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना ‘एसएमएस’व्दारे कळविला वार्षिक परीक्षेचा निकाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:52 IST

शिरपूर येथील कै. कोंडबातात्या ढवळे विद्यालय, संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाने पुढाकार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे शाळा बेमुदत बंद असून वार्षिक परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. असे असले तरी प्रथम सत्राचे गुण, अंतर्गत मुल्यमापन, प्रात्यक्षिक आणि चाचणी परीक्षेच्या आधारे वार्षिक निकाल तयार करून तो पालकांना ‘एस.एम.एस.’व्दारे कळविण्यात आला. यासाठी शिरपूर येथील कै. कोंडबातात्या ढवळे विद्यालय, संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाने पुढाकार घेतला.ऐन शालेय परीक्षांच्या कालावधीतच कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने तोंड वर काढले. यामुळे वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नाही. सोबतच खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी, शालेय शिक्षण विभागाने यंदा परीक्षा रद्द केल्या. असे असले तरी पुढील वर्गात प्रवेश देताना वार्षिक परीक्षांचा निकाल लागलेला असणे नियमानुसार आवश्यक असून प्रथम सत्राचे गुण, अंतर्गत मुल्यमापन, प्रात्यक्षिक आणि चाचणी परीक्षेच्या आधारे वार्षिक निकाल तयार करून तो पालकांना ‘एस.एम.एस.’व्दारे कळविण्यात आला.कै. कोंडबातात्या ढवळे विद्यालय व संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयातील ५ वी ते ९ वी आणि ११ वी मध्ये शिक्षण घेणाºया जवळपास १२०० विद्यार्थ्यांचा निकाल ठरविण्यात आला आहे. तो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसएमएस व दुरध्वनीची मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत शेकडो पालकांपर्यंत हा निकाल पोहचविण्यात आला. लॉक डाऊन  हटविल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना त्यांच्या आधीच्या वर्गातील वार्षिक निकाल जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी प्रथम सत्राचे गुण, अंतर्गत मुल्यमापन, प्रात्यक्षिक आणि चाचणी परीक्षेच्या आधारे वार्षिक परीक्षेचा निकाल तयार करून तो पालकांना ‘एस.एम.एस.’व्दारे कळविण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन हटविण्यात आल्यानंतर आणि रितसर शाळांचे सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देखील देण्यात येणार आहेत.- टी.ए. नरळेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाexamपरीक्षाStudentविद्यार्थीShirpur Jainशिरपूर जैन