पार्डी टकमोर ग्रा.पं. ठरत आहे विकासाचे मॉडेल!
By Admin | Updated: March 26, 2016 02:22 IST2016-03-26T02:22:08+5:302016-03-26T02:22:08+5:30
सिटीजन चार्टस्ची अंमलबजावणी; विहित मुदतीत कामाची हमी.

पार्डी टकमोर ग्रा.पं. ठरत आहे विकासाचे मॉडेल!
गजानन गंगावणे /देपूळ (जि. वाशिम)
ग्रामविकास हा देशविकासाचा पाया समजला जातो. हे ओळखून शासनाने ग्रामविकासासाठी विविध योजनांचे दालन खुले केले; परंतु या योजनांची अंमलबजावणी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये होत नाही. याला अपवाद ठरत वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर ग्रामपंचायतने विकासाचे ह्यमॉडेलह्ण इतरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.
शासनाच्या सर्वच नियम व योजनांची तंतोतंत अंमलबजावणी करून आपले गाव ह्यविकासाचे मॉडेलह्ण बनविण्याचा वसा पार्डी टकमोर ग्रामपंचायतीने घेतला असून, येथे शासनाने घालून दिलेले नियम जनतेसमोर मांडले जात आहेत. शासनाच्या योजना राबविल्या जात असल्याने सुशासन, पारदर्शक तथा गतिमान प्रशासनाची अनुभूती ग्रामस्थांना येत आहे. नागरिकांना त्यांच्या कामाकरिता वेळेवर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच ग्रा.पं. कार्यालयामध्ये उपस्थित असावेत, त्यांनी मागितलेले दाखले, प्रमाणपत्र, ठराव विहित वेळेत मिळावे, जमा-खर्च, कृती आराखडा नागरिकांना माहिती व्हावा, अशी व्यापक कल्पना शासनाची असून, नागरिकांचीही तशीच अपेक्षा असते; मात्र या सर्व बाबी तंतोतंत ग्रामपंचायतीमध्ये घडतात, असे नाही. याला अपवाद ठरत शासनाच्या सर्व नियम व योजनांची अंमलबजावणी करून आपले गाव आदर्श विकासाचे मॉडेल बनावे, अशी पार्डी टकमोर गावकर्यांची अपेक्षा असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.