राज्यस्तरीय स्पर्धेत पार्डी टकमोरच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व
By Admin | Updated: September 10, 2014 00:22 IST2014-09-10T00:22:18+5:302014-09-10T00:22:51+5:30
राज्यस्तरीय कराटेस्पर्धेत वाशिम तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकासह चार पदके पटकावलीत.

राज्यस्तरीय स्पर्धेत पार्डी टकमोरच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व
वाशिम : महाराष्ट्र युथ कराटे असोसिएशनच्या वतीने खामगाव येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र युथ कराटे स्पर्धेत वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एका सुवर्ण पदकासह चार पदके पटकावून वर्चस्व गाजविले.
महाराष्ट्र युथ कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र युथ कराटे स्पर्धेसाठी पार्डी टकमोर येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्राच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी पार्डीृ टक मोर येथील विजय उगले याने सुवर्णपदक, ईचोरी येथील पवन ठाकरे याने रौप्य, तर ईचोरीचा गजेंद्र ठाकरे आणि पार्डी टकमोरच्या चेतन चौधरीने कांस्यपदक पटकावले. त्याशिवाय या स्पर्धेत सहभागी झालेले सौरव देवळे आणि उमेश देवळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.