स्वच्छता जनजागृतीसाठी कामरगावातील दोघांची पंढरपूर-आळंदी वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:24+5:302021-02-05T09:22:24+5:30
कामरगाव : शासनाच्या वतीने ज्वलंत समस्यांबाबत जाहिराती, पथनाट्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून यातून विविध विषयांची जनजागृती केली ...

स्वच्छता जनजागृतीसाठी कामरगावातील दोघांची पंढरपूर-आळंदी वारी
कामरगाव : शासनाच्या वतीने ज्वलंत समस्यांबाबत जाहिराती, पथनाट्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून यातून विविध विषयांची जनजागृती केली जाते. शासनाच्या या उपक्रमांना हातभार लावण्यासह समाजातील ज्वलंत समस्यांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने कामरगाव येथील सुभाष डोईफोडे व सुरेश धुमाेने हे दोघे मागील ४ वर्षांपासून दुचाकीने १४०० किलोमीटर अंतराचा प्रवास करीत आहेत.
स्वच्छता अभियानासह शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी कामरगाव येथील सुभाष डोईफोडे व सुरेश धुमाेने यांची सतत धडपड सुरू आहे. यासाठी ते कामरगाव ते पंढरपूर, हा १४०० किलोमीटर अंतराचा प्रवास दुचाकीने करतात. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष असून, २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कामरगाव येथून त्यांनी पंढरपूर आळंदीकडे प्रस्थान केले. ३० जानेवारी रोजी ते पंढरपूर येथे पोहोचणार आहेत, त्यानंतर आळंदी करून ३ फेब्रुवारी रोजी ते कामरगाव येथे परत येतील. कामरगाव ते आळंदी हा १४०० किलोमीटर अंतराचा येण्या-जाण्याचा प्रवास ते सहा दिवसांत पूर्ण करणार आहेत. मार्गात स्वच्छ भारत अभियान, शौचालयाचा नियमित वापर, बेटी बचाओ बेट पढाओ, झाडे लावा झाडे जगवा व पाणी अडवा पाणी जिरवा, अशा घोषणा देत मार्गात ठिकठिकाणी उपस्थितांना ते उपरोक्त समस्यांबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करणार आहेत. आपल्या जनजागृतीने समाज मनावर काही फरक पडेल की नाही, हे माहीत नाही, परंतु आपण जे करतो ते चांगल्यासाठी करतो असा विश्वास असल्याने गेल्या चार वर्षांपासून हे दोघेजण जनजागृतीचे कार्य करीत आहे. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेसाठी शासनानेही त्यांची दखल घेण्याची गरज आहे.