सिंचन विहिरीसाठी शेतात जाऊन केले पंचनामे

By Admin | Updated: January 18, 2017 17:34 IST2017-01-18T17:34:47+5:302017-01-18T17:34:47+5:30

नवीन सिंचन विहीर मिळण्यासाठी शेतक-यांनी मानोरा पंचायत समितीकडे अर्ज सादर केले असता तालुक्यातील ग्रामपंचायतीनी शेतात जाऊन पंचनामे केले आहेत.

Panchnama went to the field for irrigation well | सिंचन विहिरीसाठी शेतात जाऊन केले पंचनामे

सिंचन विहिरीसाठी शेतात जाऊन केले पंचनामे

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 18 -   नवीन सिंचन विहीर मिळण्यासाठी शेतक-यांनी मानोरा पंचायत समितीकडे अर्ज सादर केले असता तालुक्यातील ग्रामपंचायतीनी शेतात जाऊन पंचनामे केले आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अल्पभुधारक शेतक-यांना नवीन सिंचन विहीर मिळते. 
 
त्याकरिता शेतक-यांना पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अल्पभूधारक गोरगरीब शेतक-यांना विहीर मिळण्याच्या उद्देशाने ज्या शेतक-यांच्या शेतात विहीर नाही अशाच शेतक-यांना विहीर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्याचे ग्रामपंचायतींना सांगण्यात आले.
 
त्यानुसार तळप येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली.  वैयक्तिक लाभासाठी शौचालय असणे बंधनकारक असल्यामुळे शौचालयही घरी असणे आवश्यक आहे. यापुढे पात्र लाभ नागरिकांनाच विहीर मिळणार आहे. तळप ग्रामपंचायतकडून सावरगाव येथे पंचनामे करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच, भगवान राठोड, ग्रामसेवक किसन वडाळ, तलाठी संजय वानखडे, तसेच नागरिक उपस्थित होते.
 

Web Title: Panchnama went to the field for irrigation well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.