पंचायत समितीला बीडीओ मिळाले!
By Admin | Updated: February 19, 2016 02:00 IST2016-02-19T02:00:26+5:302016-02-19T02:00:26+5:30
बदरखे यांच्याकडे प्रभार; आंदोलन तूर्तास मागे.

पंचायत समितीला बीडीओ मिळाले!
वाशिम: स्थानिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा प्रभार सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद बदरखे यांच्याकडे १७ फेब्रुवारीला सोपविण्यात आला. त्यामुळे पदाधिकार्यांच्या आंदोलनाला यश आले असून, प्रलंबित कामांना गती मिळण्याची अ पेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशिम पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांची कामे खोळंबली असल्याचा दावा पदाधिकार्यांनी केला. गत दोन वर्षांंत पंचायत समितीला पाच गटविकास अधिकारी लाभले. कायमस्वरूपी अधिकारी-कर्मचारी नसल्याने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. याकडे वरिष्ठ यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी १0 फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन केले; मात्र गटविकास अधिकारी पदावर कुणाची नियुक्ती केली नव्हती. याबाबत पदाधिकार्यांचा पाठपुरावा आणि ह्यलोकमतह्णचे वृत्तांकन यामुळे १७ फेब्रुवारीला पंचायत समि तीचे सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद बदरखे यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला. बदरखे यांनी पदभार स्वीकारला असून कामाला सुरुवातही केली.