पंचायत समितीमधून घरकुलांचे तक्रार अर्ज होताहेत गहाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 19:57 IST2017-08-17T19:56:09+5:302017-08-17T19:57:56+5:30
मेडशी: मंजूर झालेल्या घरकुलांचा लाभ देण्याकरिता प्रशासनातील कर्मचारी पैशांची मागणी करतोय, अशी तक्रार मेडशी येथील गोरगरिब विधवा महिलांनी गत १५ दिवसांपूर्वी (३ आॅगस्ट) मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. याऊलट ‘आवक-जावक’मधून अशी कुठलीच तक्रार आपल्यापर्यंत पोहचली नसून तक्रार अर्ज परस्परच गहाळ होतात, असे वक्तव्य पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी केले.

पंचायत समितीमधून घरकुलांचे तक्रार अर्ज होताहेत गहाळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी: मंजूर झालेल्या घरकुलांचा लाभ देण्याकरिता प्रशासनातील कर्मचारी पैशांची मागणी करतोय, अशी तक्रार मेडशी येथील गोरगरिब विधवा महिलांनी गत १५ दिवसांपूर्वी (३ आॅगस्ट) मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. याऊलट ‘आवक-जावक’मधून अशी कुठलीच तक्रार आपल्यापर्यंत पोहचली नसून तक्रार अर्ज परस्परच गहाळ होतात, असे वक्तव्य पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी केले.
ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबात वास्तव्य करणाºया बेघर लाभार्थींना शासनाकडून घरकुलांचा लाभ दिला जातो. त्यानुसार, मेडशी येथील अनेकांना घरकुल मंजूर झाले. मात्र, त्यासाठी लागणारी जागा स्थानिक ग्रामपंचायतीने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. याशिवाय मंजूर झालेल्या घरकुलांचे अनुदान पाहिजेत असल्यास पैसे मोजावे लागतील, असा दम प्रशासनातीलच एका कर्मचाºयाने गोरगरिब लाभार्थींना भरला आहे. त्यामुळे संतापलेल्या काही विधवा महिलांनी १५ दिवसांपूर्वी मालेगावच्या पंचायत समितीवर धडक देवून याबाबतची लेखी तक्रार सादर केली. एवढेच नव्हे तर तक्रारीत पैशांची मागणी करणाºया संबंधित कर्मचाºयाचे नावही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी किमान कार्यवाही होईल, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र, १५ दिवस उलटूनही कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तक्रारदार विधवा महिलांचा हिरमोड झाला आहे.