पोहरादेवीत " जय सेवालाल " चा गजर !

By Admin | Updated: April 4, 2017 19:02 IST2017-04-04T19:02:29+5:302017-04-04T19:02:29+5:30

देशभरातून आलेले भाविक संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत आहेत.

Pahartadevi "Jai Seva Lal" alarm! | पोहरादेवीत " जय सेवालाल " चा गजर !

पोहरादेवीत " जय सेवालाल " चा गजर !

वाशिम : रामनवमी आणि संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त बंजारा समाजाची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथे ४ एप्रिलला लाखो भाविकांची मांदियाळी आहे. देशभरातून आलेले भाविक संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत आहेत. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, देवी जगदंबा, शामकीमाता, ज्योतीबाबा, संत बाबनलाल महाराज, संत रामराव महाराज यांचे मोठ्या आस्थेने दर्शन घेवून भाविक आपला नवस फेडत आहेत.

Web Title: Pahartadevi "Jai Seva Lal" alarm!