शिरपूर जैन (वाशिम) : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाºया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. ...
वाशिम : तालुक्यात येणाऱ्या शेलु तडसे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ईमारत मागील दोन वर्षांपासून नव्याने तयार असून कर्मचाऱ्याअभावी मात्र ही ईमारत शोभेची वास्तू बनलेली आहे. कर्मचारीच नसल्याने हे उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला. ...
वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्यांची विक्री व्हावी यासाठी जिल्ह्यातील ६७१२ शेतकऱ्यानी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ६५७ शेतकऱ्यांच्या १३ हजार ६०६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ...
वाशिम : विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने कथालेखन, कवितालेखन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा शनिवार, ५ मेपासून प्रारंभ होत आहे. ...
वाशिम : रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक समोर येत असल्याने ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ वाढत आहे. ...
मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे. ...
शेलूबाजार: विवाह तालुक्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत श्रमदानासाठी नवदाम्पत्येही सहभागी होत असून, लाठी, शेंदुरजना मोरेसह विविध गावांत त्यांनी श्रमदान केले. ...
वाशिम : जिल्ह्यात ३ मध्यम व १२३ लघू असे एकंदरित १२६ प्रकल्प आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प यंदा कोरडे पडले असून दोन मध्यम व १७ लघुप्रकल्पांमधील गाळाचा उपसा करण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला आहे. ...
मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे. ...