वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By Admin | Updated: July 9, 2016 00:55 IST2016-07-09T00:55:08+5:302016-07-09T00:55:08+5:30
पाऊस जुलै महिन्यात वाशिम जिल्ह्यावर चांगलाच मेहेरबान.

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
वाशिम: शुक्रवारी दुपारपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात कोठे अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.
जून महिन्यात रूसून बसलेला पाऊस जुलै महिन्यात वाशिम जिल्ह्यावर चांगलाच मेहेरबान झाल्याचे दिसून येते. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजतापासूनच वाशिम, कारंजा व मंगरुळपीर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या पिकांना चांगलेच जीवदान मिळाले आहे. दुपारी १२ वाजतापासून वाशिम शहरात रिमझिम सुरू असलेला पाऊस दुपारी ३ वाजतानंतर दमदार झाला. यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.